रविवार, २६ मे, २०१९

कोकण मेवा

# गीता गजानन

रतांब्यांची सोला

आमच्या परसवात रतांब्यांची चार वडिलोपार्जित झाडा आसत.ही झाडा माडासारी उंच आसतत. झाडाच्या बुंध्यापासून चार फुटावर फांदये सुरु होतत.परतेक फांदीक रतांबे लागतत.या झाडार चढाक येकदम सोप्प्या आसता.
रतांबेचे झाडाक फेब्रुवारी मयन्यापासून रतांबे लागाक सुरवात होता. मे मह्यन्यात रतांबे झाडार लालबुंद होऊन पिकतत.
रतांबे काढूसाठी घरातलो येखारदो झिलगो रतांब्याच्या झाडार  परतेक फांदी हलवत चढता. मगे पिकलले रतांबे आपसूक खाली पडतत. घरातली बाईलमानसा नी न्हान पोरा खाली पडलले रतांबे गोळा करतत नी फाटयेत भरान खळ्यात व्हरतत.खळ्यात सगळीजणा टोप घेऊन येकठे बसतत नी रतांबे फोडूक सुरवात करतत. रतांब्यांची साला फाटयेत जमा करतत नी गुलाबी बीयो नी रस मोठ्या मातीच्या मडक्यात गोळा करतत.नंतर तेचेतले बीये चांगले कुवळतत नी  दोन हातान सारखे पिळून बाजूक काढतत. तेंका मगे रखा लाऊन ऊनात सुकवतत.रतांबे सोलून आंगठ्याची नरा उंबाळतत नी लय दुखतत. जास्त येळ रतांबे फोडत बसला की अंगात वात भरता.
मडक्यात जमा झालल्या आगळात लागात तितका खडे मीठ घालून खडे  विरगळेतागत  डवलेन ढवळतत. आत्ताच्या पोरांका डवली माहिती नाय. ती अशी, नारळाची करटी शाप तासून तीका गुळगुळीत करतत.नी ढाणी लालभडक तापवून करटेक दोन निमुळते भोका पाडून त्या भोकातनी फिट बसात अशी लाकडाची काठी घालतत. तेका डवली म्हनतत. पूर्वी सगळ्यांच्या घरात ही डवली  वापरत होते.मगे ती खय  धापू झाली.
आगळाचा मडक्या झाकण ठेऊन येकेबाजूक स्वैन ठेवतत.रतांब्याची सोला डाळीर पघळून घालतत नी तीन दिस हिमरात सुकवतत. तीन हिमरा लावलेनंतर तिसरे दिशी तिनसाना ही सोला आगळात घालून रातसाडी ठेवतत.दुसरे दिशी सकाळी आगळातली सोला येका फाटीत काढून टोपार फाटी पाघळत ठेवतत.मगे परत ती सोला डाळीर पघळून हिमरात सुकत ठेवतत.अधूनमधून ती वरखाली करतत जेनेकरुन सगळ्या सोलांका सारखा  हिमार लागाक व्हया .सांचेक ती सोला फाटयेत भरुन घराक घेऊन येतत नी परत रातसाडी आगळात भिजत घालतत.  हिच क्रिया अजून दोन दिस करतत. 
तीन हिमरा दिल्यानंतर सोला खाऊक तयार होतत.मडक्यात उरलेलो आगळ काचेचे बाटलेतनी घट बुच लावून भरुन ठेवतत. ह्या आगळाक दोन तीन वरसा कायैक होत नाय. जसोचो तसो रवता.
ही सोला आमी भेंडेचे सारात, माश्याच्या सारात, कोकम कढीत, चवीसाठी गोडे डाळीत, तिखट डाळीत, कुळदाच्या मोडवणीत, कुळदाच्या पिठीत, मसुरच्या सांबार्यात,सुरणाच्या भाजीत, अळूच्या भाजीत, अळूच्या गाठयेतनी, सुक्या मच्छीत, मोरीच्या मटनात वापरतव.मासे भाजताना माश्याका आगळ लावतत.अंगार पित्ताचे गांधी उठले तर अंगाक सोला चोळल्यार बरा वाटता नी सोलांनी अन्नाचा पचन नीट होता.
रतांब्यांच्या बियांका रखा लाऊन चार पाच हिमरात सुकवतत .मगे ते  बिये लाकडी टोणक्यान झेजरतत. हे झेजरलेले बिये सुपात घेऊन आसडतत नी सालपाटा येगळी करतत.  ते बिये जमा करुन आठवड्याच्या बाजारात नेऊन इकतत. त्यांका दर चांगलो येता. सोलासुध्दा इकतत. मिळालेल्या पैस्यातसून मिरगाचो बाजार करतत.
 तर दुकानात सोला दिसतत पन झाडावरसून रतांबे काढून तेची सोला बनवूक खूप खटपट आसता नी कोकणी माणूस ही कामा आवडीन करता.या लेखाचा क्रेडीट माझ्या घरवाल्यांका.
इनफारमेशन सोर्स  माझे घरवालै☺️

कोकण एक स्वर्ग

# गीता गजानन

कोकणातले काजू

कोकणात हापूस आंबो,  नारळ, पोफळी व इतर बागायतीवांगडा काजू बागायतसुद्धा असता. पूर्वी वडिलोपार्जित अशी काजूची झाडा असायची.आत्ता लोका नर्सरीतून, वेंगुर्ला क्रुषिउद्योग केंद्रातून येगयेगळ्या परकाराच्या काजीच्या झाडांचे जातींची रोपा हाडून तेंची पडीक जमनीत किंवा माळ उतारार नी आपल्या घराच्या परसवात लागवड करतत. त्या काजीच्या झाडांका चार पाच वरसांत काजी लागाक सुरवात होता.
काजीचे रोपांका दोन तीन वरसा गीमात पानी घालूचा लागता. पानी घातला की झाडा लवकर मोठी होऊन तेंका  लवकर काजू लागाक सुरवात होता. काजीची रोपा पावसाळ्यात जमनीत खड्डे करून लावतत. खड्डयातनी शेणखत घालतत. कोकणात आत्ता बर्याच ठिकाणी जमनीची भाववाटपा झालली हत.त्यामुळे सगळे आपापल्या पडीक जमनीत काजीचे झाडांची लागवड करतत.
काजीच्या झाडांका जानेवारी मह्यन्यात मोहर येता नी फका धराक सुरवात होतात. मार्च मह्यन्याच्या शेवटाक  काजीच्या झाडार बर्यापैकी बोंडवासकट काजी तयार होतत. काही लोक दोपारी काजीच्या मालकाची आजूबाजूक जाग नसताना गपचीप काजी काढून घेऊन जातत. मगे काजीच्या मालकाच्या लक्षात इल्यार मालक तेंचो उद्धार करता.
काजीचे फकांका नी पिक्या काजींका दोघांकाव बाजारात  बर्यापैकी भाव येता. जर शेतकर्याची चाळीस पन्नास बर्यापैकी काजी लागणारी झाडा आसली तर आजच्या बाजारभावापरमान दहा पंधरा हजारांचे काजी तेका सहज मिळतत.
कच्चे काजू म्हणजे फकांच्या गरांची भाजी कोकणात फेमस आसा.
पायलीभर जून फका म्हणजे ज्या फकांका डोळो इललो असतो अशी फका काठीच्या गखलेन काढून फाटयेत जमा करतत नी पाठल्याहाराक घेऊन येतत.थय घरातली बाईलमानसा हातात पलास्टिकचे पिशे (डिक लागू नये म्हनान) घालून आडाळ्यार बरोबर काजी मधोमध चिरतत किंवा पायाच्या अंगठ्यात काज धरुन टोक काढलेल्या ढोमसान  काजीचो डोळो पेचतत नी ढोमसान त्या डोळ्यामधून काज चिरतत.ढोमसाक टोक काढलेला असल्याकारनान काजीचो गरसुद्धा अलगद बाहेर येता. ह्या सगळा जपून करुचा लागता. डीक जर अंगार उडालो तर खांडका होतत.
चिरलेल्या फकातले गर गरम पानयात टाकतत. गरम पानयात तेंची सालपटा उंबाळली की तो येकेक गर हातात धरुन तेची सालपटा काढून टाकतत. मगे टोपात पानी घेऊन तेतूर ते गर स्वच्छ धुतत.तवसर घरातली दुसरी बाईमानुस चुल पेटयता नी तिच्यार तवो ठेऊन तेतूर तेल टाकता.तेल गरम झाल्यार लसणीची चेचलेली फाका टाकता. ती लाल होइत इली की चेचलेलो आल्याचो तुकडो टाकतत. नी तेतूर चार कांदे उभे चिरुन घालतत नी लाल गुलाबी होइतागत काइलत्यान पराततत.मगे तेतूर येका ओल्या नारळाचा खोबरा घालून काइलत्यान परतून परतून खरपूस भाजतत. थोड्या सुक्या खोबरा देखूल भाजून घेतत. थोडे धणे, खसखस,दोन मिरये,दोन लवंगा,  दोन तमालपत्र, दोन येलची,येक मसाला येलची, येखारदो दालचिनीचो तुकडो तव्यार भाजून घेतत. ह्या सगळा भाजलेला सामाय्न पाटो स्वचछ धुऊन तेच्यार थोडा थोडा घेऊन  वाटतत. वाटाप कसा गंधासारा बारीक जाऊक व्हया. चुलीर येक टोप तापत ठेयतत. टोप तापत इलो की तेतूर तेल घालतत, तेल गरम होइत इला की टोपात घरातलो मालवणी मसालो टाकून  जरा चमच्यान ढवळतत. मगे तेतूर साला काढलल्या बटाट्यांचे धुतलेले फोडी घालून काइलत्यान पराततत. टोपार झाकान ठेऊन झाकनात वायच पानी घालतत नी वाफ येऊ देतत. बटाटेचे फोडी जरासे शिजलेकी टोपावयला  झाकान काढतत नी त्या बटाटेचे फोडयेतनी धुतलले काजीचे गर घालतत . काइलत्यान हळूहळू पराततत मगे तेतूर वाटलेला वाटाप नी ताटातला वाटपाचा पानी घालतत. थोडा चवीपुरता मीठ घालतत नी वायच परतून येक वाफ येऊ देतत.भाजीयेतलो येखारदो गर  दोन बोटान दाबून बघतत. हे गर  पटकन शिजतत.जास्त शिजवले तर त्यांचा शँन होता. या ओल्या काजूगराच्या भाजीवांगडा गोडी डाळ नी भात  लय भारी लागता.
काजीचे आओले गर कोंब्याच्या, बकर्याच्या मटनात घातल्यार मटनाक दुप्पट चव येता.
पिके काजी भाजूचे आसल्यार न्हाणयेकडले दोन भेतळे जरासा राकेल टाकून पेटयतत. येकदा भेतळे पेटले कीतेच्यात भाजूचे काजी थोडेथोडे घालतत नी लांब दांड्यान ढवळीत रवतत.  काजी जसे भाजतत तसे ते बाजूक करतत नी तेतूर दुसरे भाजूचे काजीघालतत.काजी भाजताना काजीचो डिक उडवात म्हनान लांब रवाचा लागता.  काजी सारखे दांड्यान ढवळूचे लागतत.जर जास्त भाजले तर आतल्या गराचो करपान कोळसो होईत. म्हनान ह्या काम करुक घरातलो मोठो मानूसच लागता. भाजलेले सगळे काजी भाजून झाले की न्हानयेतल्या नळीन नायतर दगडान येयेक काज दोन बोटात धरून ती फोडतत.स्वैन फोडूक व्हयी मगे अख्खो गर बाहेर येतानायतर गराची फुटकळ
होता.
आजकाल गावागावांनी काजी भाजूचे भट्टी झालेले आसत.येक किलो काजीचे गर भाजूक ते चाळीस पन्नास रुपय घेतत.अख्खो डग्गळ गर मिळता. पन तुमका म्हनान सांगतय आपन घराकडे भाजलेल्या काजूंची चव तेंका येना नाय. घराकडे भाजलेले जरासे करापलेले टाजीचे गर पन लय भारी लागतत.
काजीची पिकलली बोंडा लाल किंवा पिवळ्या रंगाची आसतत. ही काजीची बोंडा इकत घेण्यासाठी गावागावांनी टेंपो फिरतत.लोका त्यांका बोंडा इकतत. ते बोंडांपासून सरबत, फेणी बनयतत.बोंडू गरम पानयात मीठ घालून उकडून खातत.पूर्वी आमी बोंडाची पिरगाळायचो नी बोंडू वखयच कपड्याक पचसल्यासारा करुन खायचो नी चोथो फेकून द्यायचो. जास्त ते बोंडू चानी नी टावळे खातत.काजी काढणेसाठी कोकणखत बिंबूचे काठीठ येक न्हानसी काठी बांधतत. अशे काठीक गखा म्हनतत. रोज दुपारी काजींखाली जाऊन लोका काजी काढतत. तेतूर तेंची रोज येक इरड तरी मोडता. वरते बघान मान आखाडता. सगळा निमार खावचा लागता.तेंव्हा कुठं जाऊन तेंका दोन पैसै भेटतत. ह्यामागे काजीचे मालकांची मोप मेहनत असता. पैसे देऊन दुसर्याचे जीवार ह्या काम सोडून चालत नाय. आपन स्वता त्यित खपला तरच स्वर्ग दिसता. काजींखालचो पतेरो सकाळ संध्याकाळ येकठे करून कुणग्यात नेऊन पतेर्याक आग घालूची असता.
लोकांनी काजूगराची गाववाल्यांनी दिलली भेट खाताना हे सगळे गोष्टी लक्षात घेऊक व्हयेत. इतकुच दिल्यानी तितकीच दिल्यानी आसा करु नये. ते भेटीमागची तेंची तुमचेवर असलेली माया बघावी. तेंची काजी काढताना आखडणारी मान आठवावी. नी शेवटी कुनी म्हनना केल्यान हा तळा राखी तो पानी चाखी ,हे धेनात ठेवायचा.काय जास्त कमी बोललय तर माफ करा पन जा दिसता ता मनात ठेयन्यापरीस बोलान टाकलला बरा.
तर अशा रितीने काजीची झाडा म्हनजे निसर्गदेवतेन आपनाक दिलला येक वरदान असा.परप्रांतीयांका जमनी इकून ते वरदानाची नाशाडी करु नका.  तो वरचो सगळा बघताहा. त्याची भिती बाळगा.
आपन काजींची लागवड करुक व्हयी नी जपनूक करूक व्हयी. मगे निसर्गदेवता आपल्यार खूष होऊन आपनाक मोप काजींचा उत्पादन देइत.


कोकण खाद्यसंस्कृती

# गीता गजानन

कोकणातील पारंपरिक गोड पदार्थ

घावणे

घावणे करुच्यासाठी सुरय तांदूळ टोपात घेऊन पानयान स्वच्छ धुऊन रोवळीत  पाघळत ठेवतत . तांदूळ साफ पाघळले की  सावलीत येक धोतराचो फडको हाथरतत नी तेच्यार हे तांदूळ सुकत घालतत. तांदूळ जर आंबेमोहोराचे आसले तर घावण्यांका छान वास येता. वालयचे, पांढर्या बेळ्याचे किंवा पाटणीच्या तांदळाचे सुद्धा घावणे छान होतत.
तांदूळ सुकल्यार येखारदो पंचो हाथरून तेच्यार जाता मांडतत.नी  जात्यातून बारीक पीठ येईल असे तांदूळ दळतत.मगे टोपात व्हया तितका पीठ घेतत तेतूर पानी ओततत नी पीठ दूधासारा पातळ करतत.चवी पुरता मीठ घालतत.
भिड्याक तेल लाऊच्यासाठी येक फूट लांबीचो केळीच्या पानाचो मागचो दांडो कापून घेतत.तेची पुढची बाजू कोयत्यानं झेजरतत कारन वाटयेतला तेल भिड्याक लाऊक सोप्प्या जाता.
चुलीर भिडा तापत ठेवतत. भिडा तापला की  केळीच्या दांड्यान भिड्याक तेल लावतत.तेल लावताना चुरचुर आवाज इलो मग भिडा तापला असा समजायचा. मग टोपातला पानी  पेल्यान यवस्थित ढवळतत नी भिड्यार येकाच येळी गोलाकार ओततत.नी तेच्यार येक मिनीट झाकान ठेवतत.मग झाकान काढतत. घावणो भिड्याचे कडेसून निकाळलो की काइलत्यान अलगद उचलतत नी सुपात ठेवतत.  ताटार ठेवल्यार घावणे ताटाक डसतत म्हनान सुपात ठेवतत.सुकल्यानंतर तेंची घडी करतत नी ताटात  किंवा सुपात रचवून ठेवतत. हल्ली लोका सुकवलेले तांदूळ घरघंटीर दळान हाडतत.
दुसरी येक पद्धत आसता तीव सांगतय. आपनाक व्हये तितके सुरय तांदूळ धुऊन घेतत नी रातसाडी पानयात भिजत ठेवतत. सकाळी तांदळातला पानी काढून ते वायच पानी घालून मिक्सरला लावतत. परत थोडा पानी घालून मिक्सरला लावतत. ते मिसरन येका टोपात घेऊन तेतूर दुधाइतका पातळ होइतागत वायच वायच पानी ओततत.चवीपुरता मीठ घालून ढवळतत. नी मगे वर दिलल्या पद्धतीपरमानच घावणे करतत. चाय नी घावणे, बटाटीची गोडी भाजी नी घावणे, नारळाचा रस घावणे, घावणे मटण  हे कोकणी लोकांचे आवडते मेनू आसत. आपले लेखासाठी माझे चुलत सासयेन जीका आम्ही अण्णांची काकी म्हनतव तीना घावणे नी चटणी करुन फोटू पाठवलो हा.
घावण्यांत जरासी हळद घालून पिवळे घावणे करतत.ते भारी दिसतत.

तवसाळे

तवसाळे करुचेसाठी तवसा किसनीर किसून घेतत नी तो किस  जे आपन तांदळाच्या पिठाचा दुधासारा मिसरण करतव तेतूर घालतत .वायच हातानं कुवळून येकजीव करतत नी मगे घावण्यांसारखेच पद्धतीने तवसाळे बनयतत नी नारळाच्या चटणीवांगडा  खातत.
 गोड तवसाळे बनवूचेसाठी गुळाचो किस  नी तवस्याचो किस तांदळाच्या पीठाच्या पातळ मिसरणात घालतत नी हातान चांगला येकजीव करतत.

सात कप्याचे घावन

सातकप्याचे घावन जास्त करून गणपतीचे नेवेद्यासाठी करतत. येक ओलो नारळ आडाळ्यार किसून घेतत तेतूर किसलेलो गुळ योग्य परमानात चवीनुसार घालतत. खरातर किती खोबरा हा ता बघून बाईमानसा नजरेनं गुळाचा बरोबर परमान ठरयतत . ते वाटयेंचा शास्त्र रोजच्या स्वैंपाकात बसत नाय.
गुळ नी खोबरा येकत्र करुन चुलीर शिजवतत. गुळ खोबर्यात येकजीव झालो की कायल लगेच खाली उतरायची जास्ती येळ आगीर रवलो तर तेची चिकी होयत म्हनान सांगतय.
या गुळखोबर्याच्या मिसरणात येक बारको चमचाभर तुप नी जरासी येलदोड्याची पुड मिस करायची. येलदोडे नी साखर मिकसरला फिरवून पूड करुक सोप्पी पन तेच्येपरास येलदोड्याचे दाणे काढून वरवंट्यान चेचायचे. ती जाडसर पूड अधिक भारी लागता. हे असले बारीसारीख गोष्टी पदार्थांची चव वाढवतत.
घावण्याक करतो तसाच सेम दुधासारा पातळ मिसरण बनवतत.चवीपुरता मीठ टाकतत. नी भिड्याक तेल लाऊच्यासाठी येक फूट लांबीचो केळीच्या पानाचो दांडो कापून घेतत.तेची पुढची बाजू कोयत्यानं झेजरतत कारन वाटयेतला तेल भिड्याक लाऊक सोप्प्या जाता.
चुलीर भिडा तापत ठेवतत. भिडा तापला की केळीच्या दांड्यान भिड्याक तेल लावतत.
तेल  लावताना चुरचुर आवाज इला की भिडा तापला असा समजायचा. मगे टोपातला पानी  पेल्यान यवस्थित ढवळतत नी भिड्यार येकाच येळी गोलाकार ओततत.नी तेच्यार येक मिनीट झाकान ठेवतत.मग झाकान काढतत. घावन्याच्या अर्ध्या भागात उजया बाजूक
गुळ खोबर्याचा मिसरण पसरवतत. मगे घावन्याची डावो भाग उजया भागार परततत नी काइलत्यान हलका हलका दाबतत.  पेल्यान चायवाला चाय वरखाली करतो तसा  घावन्याचा पानी वरखाली करतत नी रिकाम्या जागेर ओततत.
जरा पीठ शिजला की तेच्यार  भरपूर भाजलेला गुळखोबरा शिवारतत नी घावन्याची उजयी बाजू डाव्या बाजूर उपडी करुन काइलत्यान दाबतत. असा सात येळा करतत म्हनान तेका सात कापेचो घावन म्हनतत.

 माहिती स्त्रोत। माझी नणंद .ती सगळेच गोड पदार्थ लय भारी बनवता. सगळ्यांका कायमाय करून खाऊक घालूक तिका लय आवाडता.

मोदक

आज संकष्टी  आसा. त्यानिमतान मोदक करुया.
मोदक करुचेसाठी सुरय तांदूळ टोपात घेऊन पानयान स्वच्छ धुऊन रोवळीत  पाघळत ठेवतत . तांदूळ साफ पाघळले की  सावलीत येक धोतराचो फडको हाथरतत नी तेच्यार हे तांदूळ सुकत घालतत.
तांदूळ जर आंबेमोहोराचे आसले तर घावण्यांका छान वास येता. वालयचे, पांढर्या बेळ्याचे किंवा पाटणीच्या तांदळाचे सुद्धा मोदक छान होतत. मोदकासाठी नव्या तांदळाचा पीठ लागता . तेका चीकटपना आसता. जुन्या तांदळाच्या पीठान मोदकाक तडे जातत. मोदक वळताना फुटतत नी येकदा फुटाक लागले की मग सगळोच मुड आँफ होता. म्हनान पीठाचो रोल लय म्हणजे लयच महत्वाचा.
माका येकदोनदा वाण्यान जुना मोदकाचा पीठ दिलला. नी मोदक वळूक घेतल्यार लागले फुटाक मगे मी त्या पीठाचे सरळ नेवरे केलय नी मोकळा झालय.
मोदक करुचेसाठी टोपात वाटीभर पानी उकळत ठेवायचा. तेतूर चिमुटभर मीठ टाकायचा नी  वायच तुप टाकायचा.
तुपान मोदकांका चकाकी येता.पानयाक उकळी आली की तेतूर चाळलेला सुवासिक तांदळाचा पीठ अंदाजान घालायचा नी काइलत्यान ढवळायचा. पीठाचे गुठळे होऊक देवचे नाय.मगे तेच्यार झाकान ठेऊन येक वाफ देतत नी टोप चुलीवरना खाली उतरवतत. गरम पीठ वायच गार होऊक लागला की परातीत घेऊन येकसारा मळतत.
 वाटीत तुप घेतत.तुप बोटांका लाऊन न्हान गोळो  घेऊन तेची बोटांनी पारी तयार करतत. तेतूर चमचाभर गुळखोबर्याचा सारण भरतत.नी पारीक दोन बोटांनी कळ्या करतत. त्या कळ्या पाचव बोटांनी  येकठे करतत. नी  मोदक तयार होता.
मोदक बनवून होऊचे आधीच टोपात पानी उकळत ठेवतत. तेच्यार चाळण ठेवतत. धुऊन पुसलली परसवातली हळदीची पाना चाळणीत ठेवतत.मगे चाळणीत सगळे मोदक गोलाकार लावतत. थोडेसे नेवरेपण करतत. मोदकाच्या कळ्या करूक माका न्हानपणी जमत नव्हत्या पन करुची आवड.मग आईन माका चार पाकळेचे मोदक शिकवलेले. ते पण भारी दिसतत.
हळदीच्या पानान मोदकांका मस्त सुवास येता.

शिरवाळे

रसशिरवाळे ह्यो न्हानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचो येकदम आवडीचो पदार्थ हा. हेच्यासाठी घावण्यासाठी आपण जा पीठ तयार करतो तसा पीठ जात्यार दळून तयार करतत.
आपनाक जितके शिरवाळे करुचे हत ते अंदाजान पीठ येका मोठ्या परातीत घेतत. तेतूर वायच मीठाचो खडो टाकतत. येका मोठ्या टोपात भरपूर पानी उकळत ठेयतत. उकळता पानी तांबयान ते पीठात लागात तसा ओततत.
जास्त ओतून ठेवला तर तेची पिठी होयत.म्हनान अंदाज घेऊन ओततत.काईलत्यान पीठ नी पानी ढवळून येकजीव करतत. थंड पान्यात हात बुडवून ता उन उन पीठ  येकदम चांगला मऊसूत मळून घेतत.नंतर ते पीठाचे लांबट मुटकूळे बनवतत नी ते टोपातल्या उकळत्या पानयात सोडतत.हे मुटकुळे सावशीत पानयात सोडूचे लागतत नायतर उकळता पानी अंगार पडूची भिती आसता. टोपार झाकान ठेवतत. पाच मिनटात झाकान काढतत नी मग ते मुटकुळे पानयार तरंगाक लागले की चमच्यान येयेक मुटकुळो काढतत नी लाकडी सोर्यात घालतत. हे कामाक दोन मानसा लागतत.
येकजण शेवग्याचा हँडल हळूहळू खाली करता तसे शिरवाळे सोर्यातून खाली येऊ लागतत दुसरो मानूस ताटात केळीचा पान घेऊन ते ताट पुढेमागे करत तेतूर शिरवाळे काढून घेता. ताटातले शिरवाळे सुपात केळीचा पान घालून तेच्यार काढून ठेवतत.
स्वच्छ धुऊन पुसलेल्या केळीच्या पानांत  शिरवाळे वाढतत तेच्यार रस ओततत नी खाऊक सुरवात करतत.रस शिरवाळे आसले की घरात भात,डाळ,भाजी असा जेवण करुची गरज लागत नाय.घरातली न्हानमोठी सगळीजणा पंगतीत बसान केळीच्या पानार पोटभर रस शिरवाळे खातत.
शिरवाळ्यांचो शेवगो परतेकाचे घरात वडिलोपार्जित असता. तो लाकडी नायतर पितळेचो आसता. कोनायजवळ नसलो तर शेजार्यांकडसून मागून हाडतत नी रसशिरवाळे करतत.

नारळाचो रस

घावणे, शिरवाळे, खापरोळै हे नारळाच्या रसातून खातत. ओलो ताजो नारळ रसासाठी वापरतत.नारळ फोडून तो आडाळ्यार बारीक किसतत. जिरा पानयात भिजत घालतत.
किसलेला ओला खोबरा,भिजत घातलेला जिरा नी येलचीचे दाणे मिक्सरच्या भांड्यात घालतत नी वायच पानी टाकून बारीक करतत. नायतर पाट्यार वाटतत. मगे येका स्टीलचे टोपार पातळ फडको घट धरून तेच्यार ह्या वाटाप ओततत.फडको चारवले टोकांनी धरून तेची गठली करुन नारळाचा दूध शाप पिळून घेतत.
गठलेत जो चोथो रवता तो वायच पानी घालून परत येकदा मिक्सरला लावतत नी पातळ फडक्यान गाळून घेतत.ह्या गाळलेल्या नारळाच्या दूधात गुळ किसून टाकतत , वायच हळद टाकतत. गुळ पुरा इरघळेतागद हाताचे बोटांनी कुवळतत.हळूहळू गुळ नारळाच्या दूधात येकजीव होता. मग ह्यो रस पातळ फडक्यानं पुन्हा येकदा गाळून घेतत.



कोकणातील पारंपरिक पदार्थ


# गीता गजानन

कोकणातील पारंपरिक गोड पदार्थ

खापरोळी

खापरोळी करुचेसाठी दुपारी तीन चार वाजता चार पेले सुरय तांदूळ, पेलोभर उडदाची डाळ, अर्धो पेलो चणाडाळ, पाव वाटी मेथी येका टोपात घेवा.पानी घालून स्वच्छ धुवा. त्यात दोन तांबये पानी ओतून भिजत ठेवा. साधारण चार पाच तासानी तेतुरला पानी काढून टाका.  ते भिजवलेले डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घाला.तेतूर वायच पानी घाला नी जाडसर वाटून घेवा.वाटाप मोठ्या टोपात ओता.
मिक्सरच्या भांड्यात वायच पानी घालून ता पानी वाटपात ओता.तेतूर हळद , चवीपुरता मीठ टाका नी चायवालो भैयो चाय पेल्यान वरखाली करतो तसा पीठ हातान वरखाली करा.
 माझी  आजी असा करीत होती. मी बघित रवलय तवा आजीन सांगितलेला की पीठ ढवळला नी हातान वरखाली केला की पीठात हवा शिरता.त्याना पोळये, खापरोळै भुसभुसीत होतत.
पीठ नीट ढवळून तेच्यार झाकान लावून ठेवा. पीठ लवकर इला तर फसफसावून व्हावून जाता म्हनान टोपाखाली परात नायतर ताट ठेवा. थंडीत पीठ उसरा येता. पावसाळ्यात असले पदार्थ पचाक जड म्हनान करु नये.गरम्यात पीठ लवकर येता म्हनान जरा लवकर हाथरुनासून उठूचा.
न्हाऊन झाल्यार पीठाचे टोपाकडे जावा. पारोसा नाय जायचा.भिडा जरा धुवून घेवा नी तापत ठेवा.पीठ येकदा डावान ढवळून घ्या. चुलीर भिडा ठेवा. तेका केळीच्या दांड्यान नायतर नारलाच्या किशियेन तेल लावा.भिडो तापलो की गेस कमी करुन डावान भिड्यार पीठ ओतायचा नी गोल फिरवायचा.मधी जाड रवता कामा नये.मग तेच्यार झाकान ठेवायचा.थोड्या येळान झाकान काढायचा.पोळयेक मस्त जाळी पडलली दिसली काय खापरोळी काइलत्यान हळू परतायची.वर जरा पानयाचो हबको मारायचो.खापरोळी पावासारखी शिजता. गेस कमी ठेवायचा.मोठा ठेवला तर भिडा करापता नी पोळयेव करापतत. असेच सगळे खापरोळे काढून सुपात ठेवायचे.थंड झाल्यार येका टोपात खाली केळीचा पान घालून तेच्यात खापरोळ्यांचो ढीग ठेवायचो.
मग नारळाचो रस बनवायचो.
खापरोळी खाऊक देताना खोलगट ताटात खापरोळे ठेवायचे. तेच्यार नारळाचो रस घालायचो नी दहा मिनटा खापरोळी  रसात मुराक व्हयी. मगे खाऊक सुरवात करायची. पोट पूरा भरेसर फूल कन्संट्रेशने ह्या रसखापरोळी खाऊचा काम करुचा.


नारळाचो रस

घावणे, शिरवाळे, खापरोळै हे नारळाच्या रसातून खातत. ओलो ताजो नारळ रसासाठी वापरतत.नारळ फोडून तो आडाळ्यार बारीक किसतत. जिरा पानयात भिजत घालतत.
किसलेला ओला खोबरा,भिजत घातलेला जिरा नी येलचीचे दाणे मिक्सरच्या भांड्यात घालतत नी वायच पानी टाकून बारीक करतत. नायतर पाट्यार वाटतत. मगे येका स्टीलचे टोपार पातळ फडको घट धरून तेच्यार ह्या वाटाप ओततत.फडको चारवले टोकांनी धरून तेची गठली करुन नारळाचा दूध शाप पिळून घेतत.
गठलेत जो चोथो रवता तो वायच पानी घालून परत येकदा मिक्सरला लावतत नी पातळ फडक्यान गाळून घेतत.ह्या गाळलेल्या नारळाच्या दूधात गुळ किसून टाकतत , वायच हळद टाकतत. गुळ पुरा इरघळेतागद हाताचे बोटांनी कुवळतत.हळूहळू गुळ नारळाच्या दूधात येकजीव होता. मग ह्यो रस पातळ फडक्यानं पुन्हा येकदा गाळून घेतत.

रसखापरोळी ह्या येक पूर्णान्न आसा.
खापरोळे नी रस केलो की डाळ, भात, भाजी आमी करत नाय. रस खापरोळेनेच पोट भरता नी आत्मो परमात्म्याक पोचता.

सोजी

सोजी करुचेसाठी गव्हाचो जाडो रवो घेवा. तो नीट निवडा. टोपात तुप घाला. तेतूर रवो घाला.रवो मंद गेसवर काइलत्यान भाजून घेवा.करपाक देऊ नका.तेतूर गरम पानी ओता नी काइलत्यान अधना मधना ढवळीत र्हवा.रवो बोटान दाबून बघा. बोटचेपो झालो की तेच्यात किसलेलो  गुळ घाला.वायच  हळद, मीठ टाका.
अर्धी वाटी किसलेला ओला खोबरा घाला.
पाट्यार सुंठेचो तुकडो झेजरा. चार पाच येलचीचे दाणे नी सुंठीची पूड सोजीत घाला. मुठभर भाजलेल्या काजींचे तुकडे घाला. गर नसले तर शेंगदाणे भाजून करटीन भरडा. सुपात घेऊन आसडा नी ते सोजीत घाला नी मंद गेसवर शिजाक देवा. तवसा घरात असल्यार तवस्याचो किस सुद्धा हेतूर घालतत.जास्त घट जाताहा सी वाटली तर वायच गरम पानीै घालून काईलत्यान ढवळा. काहीजना खोबरा वाटून पन घालतत..
कोकणात लग्नसमारंभात, धार्मिक कारयक्रमाचे येळी सोजी अदरून करतत.

सोजीचो फोटू सौजन्य गुगल